Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी
पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रकने ७ ते ८ वाहनांना उडवलं..!
पुण्यातील नवले ब्रिजजवळ होणार्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपुर्वी ब्रिजजवळ भीषण अपघात होवून काही जणांचा मृत्यू झाला होता. आज (दि.१६) पुन्हा एका भरधाव ट्रकने ७ ते ८ वाहनांना उडवल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. अपघातात एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

भारती विद्यापीठ पोलिस आणि वाहतून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. कात्रजकडून नवले ब्रिजकडे जाणार्या भरधाव ट्रकने शोभणी हॉटेल समोर कार, रिक्षा इतर इतर वाहनांना धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एक महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.





