Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

जर केंद्राने मोफत कोरोना लस दिली नाही तर आम्ही देऊ, ‘या’ मुख्यमंत्र्याची घोषणा

कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून देशात सुरू होत असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना लस देण्यात येणार आहे. केजरीवाल म्हणाले आहेत की जर केंद्राकडून ही लस विनामूल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की आपला देश अत्यंत गरीब आहे आणि ही महामारी 100 वर्षांत प्रथमच आली आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना ही लस परवडणार नाही. माझं केंद्राला आवाहन आहे, की “ही लस देशभरात विनामूल्य उपलब्ध करुन द्यायला हवी. यावर केंद्र काय निर्णय घेतंय हे आम्ही पाहणार आहे. जर केंद्र सरकाराने दिल्लीतील लोकांना मोफत लस देण्यास नकार दिला तर आम्ही दिल्लीच्या लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन देऊ.”

सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले की, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेका लसीच्या खाजगी बाजारात कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोस 1000 रुपये असेल. ते म्हणाले, “आम्ही सरकारला प्रति डोस 200 रुपये विशेष दराने लस दिली आहे, जे सुरुवातीच्या 10 कोटी डोससाठीचे दर असेल. परंतु, खाजगी बाजारपेठेत आम्ही ही लस प्रतिडोस 1000 रुपये दराने देऊ. भारत सरकारकडून या लसींच्या किंमतींबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button