Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकर एकमेकांसमोर येतात तेव्हा…

महाराष्ट्रातील राजवंश घराणे म्हणजे खासदार उद्यनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर हेच. पण सध्याच्या काळात साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर साताऱ्यासह  महाराष्ट्राला माहिती आहे. एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी दोन्ही नेते सोडत नाहीत. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये मात्र मागील काही दिवसात संघर्ष मिटल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावेळी शरद पवारांनी मध्यस्थी करून देखील हा वाद मिटला नव्हता. मात्र आता दोन्ही नेत्यांमधील वाद मिटल्याचे पाहण्यास मिळत आहे.

पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांची चक्क गळाभेट झाली.

याआधी सातारच्या शासकीय विश्रामगृहामध्ये दोन्ही नेत्यांची अचाकन भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर आता पुण्यात दोन्ही नेत्यांची चक्क गळाभेट झाल्याने दोघांमधील मतभेद संपल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे येत्या काळात यांच्यातील राजकीय स्पर्धा संपून एक वेगळेच समीकरण पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button