महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; ४ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू, मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Maharashtra Rain : मुंबई, पालघर, पुणे, नाशिक व इतर ठिकाणी झालेली अतिवृष्टी ही राज्यावरील आपत्ती आहे. चार दिवसांतील विक्रमी पावसामुळे आतापर्यंत विविध कारणांनी ६३ बळी गेले आहेत. जनता संकटात आहे, कृपया या विषयाचे राजकारण होऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी आज अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात केले.
मंत्री महाजन म्हणाले, आपण आताच पुण्याहून आलो. दिड दिवसांत ६३५ मी.मी.पाऊस झाला. १९८२पासूनचा कचरा डेपो होता. तो इमारतीवर कोसळला. तिथे ढिगा-याखाली तेवीस लोक अडकले, अकरा जणांना बाहेर काढले. त्यामध्ये सहा जखमी आहेत. काही तास झालेत आत अडकलेले सुरक्षित असतील सांगणे कठीण आहे.
ते म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस नाही. पण जिथे झाला तो एल निनो सुचना असताही प्रचंड झाला. चारशे-साडेचारशे मी.मी.पाऊस, वादळी वारे, समुद्राला भरती यामुळे तेही पाणी किनाऱ्यावर येत आहे. हे संकट मोठं आहे. पाणी उतरावं लागेल.
हेही वाचा – शिवसेना नावावरून खडाजंगी; नोंदणीकृत नाव स्क्रीन वर दाखवले जाईल उप सभापती सचिन अहिर यांचे निर्देश
आपण जिथे जिथे पाऊस होतोय तिथे धावून जात आहोत. शासन कोठेही कमी पडत नाही.अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यात प्रत्येकी एक कोटी रुपये दिले. पालघर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे. मोबाईल नेटवर्क नाही.
धोकादायक ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित केले. अन्नधान्याचे कीट दिले. या अतिवृष्टीकाळात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत केली. सभागृहाने ठरवलं तर अधिक मदत देता येईल. मिसींग लिंक दरड कोसळणे संदर्भात काहीही धोका झाला नाही. या आपत्ती काळात लोकांना जी शक्य ती मदत करु, असेही महाजन यावेळी म्हणाले.





