Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई
ईडीच्या कारवाईवर संजय राऊत यांची शायरी, म्हणाले…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. यानंतर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत ईडी तसंच भाजपावर गंभीर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे.
पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी ‘कोणामध्ये किती जोर आहे पाहूया’ अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी अजून एक शायरी ट्विट केली आहे. “मला बदनाम करण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न केला आहे, तेव्हा मी उभारी घेतली आहे” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.





