Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेची निर्घृण हत्या? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण…

अमरावती : अमरावती शहरातील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन २१ जूनला रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. उदयपूरमधील हत्याकांडानंतर अमरावतीच्या या हत्येबाबत आता मोठे खुलासे समोर येत आहेत. अशात कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी ‘एनआयए’ने करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती.

दरम्यान, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू असून, आतापर्यंत पाच आरोपींना अटक आहे.

खून लुटमारीच्या उद्देशाने झाला की…

मात्र, हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याचा शहर पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली नंतर घटनास्थळीसुद्धा पाहणी केली. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचीसुद्धा झाडाझडती घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची चौकशीची मागणी…

उमेश कोल्हे यांचा खून लूटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणी मोठा चायनीज चाकू त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नूपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहे का? हे पडताळण्यासाठी ‘एनआयए’ने तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button