breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

उदयनिधींचं सनातन धर्माविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले..

Udhayanidhi Stalin : सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांशी तुलना करणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्या जुन्या वक्तव्याचं, भूमिकेचं समर्थन करण्यासाठी आणि आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत हे सांगण्यासाठी त्यांनी सनातन धर्माबाबत टिप्पणी केली आहे.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, मी काहीच चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरा जाण्यासाठी तयार आहे. कारवाईच्या भितीने मी माझं वक्तव्य बदलणार नाही. मी माझी विचारधारा मांडली आहे. आंबेडकर, पेरियार आणि थिरुमावलवन यांनी जे म्हटलं होतं तेच मी म्हटलं आहे. त्यापेक्षा जास्त काहीच बोललो नाही. मी आज आमदार, मंत्री आणि पक्षाच्या युवा शाखेचा सचिव असू शकतो, उद्या कदाचित मी यापैकी कुठल्याच पदावर नसेन. परंतु, आपण माणूस असणं गरजेचं आहे.

हेही वाचा – World Cup 2023 : अशाप्रकारे वर्ल्डकप फायनल आणि सेमीफायनलचे तिकीट खरेदी करता येणार

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. जयचंद्रन यांनी उदयनिधींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. जयचंद्रन म्हणाले, सत्तेत बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यांनी अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार करू नये. जी विचारधारा जात आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये दरी निर्माण करते, ती विचारधारा सार्वजनिकरित्या मांडण्याऐवजी ते (उदयनिधी) राज्यातील अंमली पदार्थांच्या समस्येचे उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.

मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही अनेक वर्षांपासून सनातन धर्माविषयी बोलत आहोत. सनातन धर्म हा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा आहे. आम्ही नेहमीच त्याचा विरोध करू.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button