breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सैराट फेम आकाश ठोसर मैदानात

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी फिटनेसला जवळ करणे जसे महत्वाचे असते, तसेच आपल्या देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचारला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे मत सैराट फेम लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर याने व्यक्त केले.

मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती. बँकेचे एस.एस.पी.रॉय फील्ड जनरल मॅनेजर, वजाहात अली मुख्य प्रबंधक, सरकारी व्यवसाय यांच्यासह बँक अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबईकर नागरिकांसह सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर ही सहभागी झाला होता.

यावेळी आकाश म्हणाला, भ्रष्टाचारविरोधात बोलायला हवं, छोट्या-छोट्या पावलांनीच सुरुवात होते, याविषयी बोललं पाहिजे. जमेल तिथे आवाज उठवला पाहिजे. फिटनेसच्या माध्यमातून केलेल्या या जनजागृतीमुळे नक्कीच फायदा होईल आणि अनेकजण सजग होतील.

हेही वाचा – उदयनिधींचं सनातन धर्माविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले.. 

अगदी पाहाटे आलेल्या मुंबईकर मंडळींसोबत आकाशने मरीन ड्राईव्ह इथे मनसोक्त फोटो सेशनही केले. आपण लवकरच बहुचर्चित बाल शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आकाशने यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना आकाश फिटनेसबद्दलही भरभरून बोलला. आपण प्रत्येकाने शरीराची काळजी घ्यायलाच हवी आणि त्यासाठी दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यायला हवा असे आकाशने सांगितले. एकूणच जनजागृतीबद्दल आयोजित केलेल्या या वॉकेथॉनला फिटनेस फंडा आवडीने जपणाऱ्या आकाशच्या उपस्थितीने सर्वांचाच उत्साह वाढलेला दिसला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button