breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळला, पाहा थरारक घटनेचा व्हिडीओ

Chiplun Bridge Collapse : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी पुलाचा एक गर्डर खाली कोसळला होता. मात्र काही वेळात पूलाचा काही भाग कोसळला आहे. पुलाचे काम करणारी क्रेन देखील पूर्णपणे खराब झाली आहे.

बहादुरशेख नाक्यातील उड्डाणपुलामध्ये एकूण ४६ पिलर असून ६ व्या पिलरपर्यंतचे काम पूर्ण होत आले होते. मात्र अचानक सोमवारी सकाळी उड्डाणपुलाचा गर्डर खचल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर थोडा वेळ काही झाले नाही. मात्र आता मात्र उड्डाणपुलाचा काही भागच खाली कोसळला आहे.

हेही वाचा – रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास होऊ शकतो ‘इतक्या’ रुपयांचा दंड 

पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला असं तेथील काही नागरिकांनी म्हटलंय. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button