breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

वाहनचालकांकडून पैसे उकळणारे दोन वाहतूक पोलिस निलंबित

पुणे : वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे स्वीकारत असल्याच्या संशयावरून वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बुधवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली.

बाळू दादा येडे आणि गौरव रमेश उभे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे कर्मचारी स्वारगेट वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत.

बाळू येडे आणि गौरव उभे यांच्याविरुद्ध प्रफुल्ल सारडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर १७ मे रोजी गंगाधाम – आई माता मंदिर रस्ता या ठिकाणी वाहतूक पोलिस अंमलदार नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ पुणे शहर वाहतूक पोलिसांना टॅग केले. हे व्हिडिओ वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅपवर सकाळी प्राप्त झाले. येरवडा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी यांनी व्हिडिओची पाहणी केली.

हेही वाचा – बैलगाडा प्रेमींसाठी खासदार अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, म्हणाले..

त्या व्हिडिओमध्ये वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे स्वीकारतानाच्या संशयास्पद हालचाली आहेत. तसेच, त्या व्हिडिओमध्ये वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नाही. कर्तव्य करीत असताना बेशिस्त आणि अशोभनीय वर्तन करून पोलिस खात्याची प्रतीमा जनमानसात मलीन केली आहे. प्राथमिक विभागीय चौकशीतील कार्यवाहीनुसार या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना १७ मेपासून सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button