breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

बैलगाडा प्रेमींसाठी खासदार अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, म्हणाले..

पुणे : सुप्रिम कोर्टाने राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे शौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच भेटीला येणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरू झाली आहे. लवकरच हा दिमाखदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दबावतंत्र वापरलं जात आहे. हे अनेक वर्ष संसदेत हा विषय मांडतनाना मी अनुभवत आहे. या आंतरराष्ट्रीय दबावतंत्राचा देखील बुरखा पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा – प्रियकरानेच प्रेयसीचे केले तुकडे-तुकडे, गुगल सर्च हिस्ट्रीन सर्व वास्तव समोर

काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका १५७ देशांमध्ये पोहोचली. त्यावेळी संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरातील मुलांपर्यंत पोहोचला. त्यानंतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने प्रेक्षक इतिहास अनुभवत आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे. ती याच पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विदेशी लोक येतील आणि या शर्यतीचा एक मोठा सोहळा होईल, असा पद्धतीने हा चित्रपट तयार केला जाणार आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. सगळ्या बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी हा दिवाळी, दसऱ्यासारखा दिवस आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी देतात सुप्रीम कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. आनंदाची बाब असली तरीदेखील ही बाब असली तरीदेखील ही मोठी जबाबदारीही आहे. सुप्रीम कोर्टाच्या सर्व नियमांचं पालन करून यापुढील बैलगाडा शर्यती दिमाखदार पद्धतीने पार पाडतील. याचसाठी केला होता अट्टाहास, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक बैलगाडा मालकाचं, शौकिनांचं आणि प्रेमींचं हे मोठं यश आहे. यातून परंपरेचं जतन होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button