breaking-newsताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय

सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणारे दोन शूटर पुण्यातले? तपासात धक्कादायक खुलासे

पुणे : पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची कबुली लॉरेन्स यांनी दिली आहे. त्यानंतर या हल्ल्याबाबत नवनवीन खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे. सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. भर दिवसात जीपमधून जात असताना मुसामध्ये बंदुकीने गोळ्या घालून मूसेवालाचा खून करण्यात आला होता. हल्ल्यानंतर मूसेवाला त्यांच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला याच्यावर ज्या आठ जणांनी गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोघेजण पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी अशी दोघा शूटरची नावं आहेत. मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबचे, तिन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते, असं सांगण्यात येत आहे.

मुसेवाला याच्या हल्ल्याबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्र्नोई याने यापूर्वीच या खुनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर या प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याच्या संशयावरून २ जणांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. संतोष आणि सौरभ हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. दरम्यान, मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे गुन्हे शाखा संतोष जाधवच्या शोधात आहेत.

‘सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन’, असे स्टेटस संतोष जाधव यांनी सोशल मीडियावर टाकलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ओंकारने संतोष जाधव यांना भेटून मारहाण करणार असल्याचं लिहिलं. कोणीही येऊ द्या त्यानंतर १ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून आलेल्या शूटरने ओंकार उर्फ रानिया बाणखेले यांची भरदिवसा गोळीबार करून हत्या केली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचं समोर आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधव याची माहिती सांगितली होती. संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो त्यावरून आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली आहे. याचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button