breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

‘काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसूच शकत नाही’, ‘या’ नेत्याचे सूचक वक्तव्य

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात तयारीला जोर आला आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? याचा निर्णय अजून झाला नाही. तर भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेत्यांकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील असा दावा केला जात आहे.

काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यंनी एक सूचक वक्तव्य केले आहे. मुंबई महापालिकेवर आमच्या मदतीशिवाय महापौर बसूच शकत नाही, असे विधान करत त्यांनी शिवसेनेला इशाराच दिला आहे.

वाचाः पुण्यात अजित पवार समर्थक नगसेवकाच्या हत्येची सुपारी; गुन्हा दाखल

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्लम शेख म्हणाले की, आगामी काळात काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही. येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.

मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. अन्यथा मला पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button