breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात मोठा वाद! व्हिडीओ व्हायरल..

Gautam Gambhir vs Sri Sreesanth Controversy : लेजेंड्स क्रिकेट लीगचा एलिमिनेटर सामना गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरतमध्ये खेळला गेला. यासामन्यावेळी माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला.

एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. सामन्याच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीर स्ट्राइकवर असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. गंभीरने श्रीसंतचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू डॉट होता. यानंतर श्रीसंतने निराशेने गंभीरकडे पाहत काही शब्द बोलल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा  –  आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सरकारकडून SIT चौकशी

याला प्रत्युत्तर म्हणून गंभीरने या वेगवान गोलंदाजाकडे रोखून हातवारे केले. हा वाद इथेच थांबला नाही. एका चाहत्याने स्टँडवरून रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, हा व्हिडीओ कॅपिटल्सचा फलंदाज बाद झाल्यानंतरचा आहे. त्या ब्रेकदरम्यान गंभीर आणि श्रीसंतमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button