breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांगांना व्यवसायासाठी दोन लाखांचे कर्ज मंजूर, पालिकेच्या योजनेतून रक्कम खात्यात जमा

  • समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांची माहिती

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यांतर्गत मनपा कार्यक्षेत्रात व्यवसाय करणा-या दिव्यांगांना दोन लाखांचे कर्ज देण्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कन्हैया छोटेलाल परदेशी यांना दोन लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यात त्यांना 50 टक्के सबसिडी योजना लागू होणार आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी सांगितली.

पालिकेने परदेशी यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे प्रशासकीय कामकाज पूर्ण केले. त्यानुसार त्यांना मिळणा-या रक्कमेतून 1 लाख रुपये माफ होणार आहेत. तर 1 लाख रुपये व्यवसायासाठी वापरता येणार आहेत. दिव्यांगांना व्यावसायिकदृष्ट्या उभारी देण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. ही रक्कम दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय योजनेतून देण्यात आली आहे.

जास्तीजास्त दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे. यासाठी ही योजना राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील एकमेव पालिका आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील दिव्यांग बांधवांनी कधीही संपर्क साधावा, असे आवाहन अधिकारी ऐवले यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button