breaking-newsराष्ट्रिय

बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट, जपानहून बडोद्यात पोहोचले 20 ट्रॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगात सुरू झाल्याचं दिसतंय. जपानहून पहिली कंसाइनमेंट (मालवाहतूक) मुंबईमार्गे बडोद्यामध्ये पोहोचली आहे. यामध्ये 250 टन वजनाच्या 20 स्लीपर स्लॅब ट्रॅकचा समावेश आहे. जपानहून हे 20 ट्रॅक सर्वप्रथम मुंबई पोर्टवर आले, तेथून काल(दि.14) बडोद्याकडे पाठवण्यात आले.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Gujarat: First consignment of 20 sleeper slab tracks weighing 250 tonnes for construction of Mumbai-Ahmedabad bullet train, shipped to Vadodara from Mumbai Port earlier today. The consignment had come from Japan.

2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मात्र, ‘जमिन अधिग्रहण आणि अन्य प्रक्रियांमध्ये वेळ गेल्याने प्रकल्पास उशीर होऊ शकतो, 2002 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी असून 2023 मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येईल’, असं नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) म्हटलंय.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बडोदा स्थानकाचं डिझाइन देखील तयार झालं आहे. तसंच बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी बडोद्यामध्ये प्रशिक्षण अकादमी देखील सुरू आहे. जाणून घ्या कसा आहे बुलेट ट्रेनचा प्रकल्प –
बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर रोज 70 फे-या मारेल. गर्दीच्या वेळी (सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत) तीन बुलेट ट्रेन धावतील असा प्रस्ताव आहे, तर गर्दी नसताना दोन बुलेट ट्रेन धावतील. या मार्गावर 12 स्थानकं असतील – बीकेसी, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद.

एनएचएसआरसीएल हाय स्पीड आणि स्लो अशा दोन ट्रेन चालवणार आहे. हाय स्पीड ट्रेन मुंबई, सूरत, बडोदा आणि अहमदाबाद या स्थानकांवर थांबेल तर स्लो ट्रेन या मार्गावरील 12 स्थानकांवर थांबेल.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दररोज विमानाने जवळपास 4 हजार 700 लोक प्रवास करतात, तर 500 प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. याशिवाय जवळपास 15 हजार जण कारचा वापर करतात. दोन्ही शहरांमध्ये बुलेट ट्रेनच्या सहाय्याने 40 हजार जणांना प्रवास करता येईल.

दीडपटीने भाडे जास्त –

सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही दीडपटीने भाडे जास्त ठेवण्यावर विचार केला जात आहे.

24 बुलेट ट्रेन-
बुलेट ट्रेन प्रकल्पात 24गाडय़ा येणार आहेत. यात सुरुवातीला काही बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनविण्यात येणार आहेत. 10 आणि बारा डब्यांच्या या ट्रेन असल. दहा डब्यांच्या गाडीत 750 आसन व्यवस्था असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसने असतील. 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.

आणखी काय असतील सुविधा –
– उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
– आधुनिक प्रसाधनगृहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे.
– एखादा प्रवासी आजारी झाल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
– डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
– स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
– स्वयंचलित ब्रेक यंत्रणा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button