ताज्या घडामोडीपुणे

‘शाळेला जायला उशीर एसटी चालू करा ;शाळेय विद्यार्थ्याने गायलेले गाणे

सिंधुदुर्ग | एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Worker’s Strike) सुरू झाल्यापासून सर्वच प्रवाशांचे हाल होत असले तरी देखील या संपाचा फटका ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसत आहे. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शाळा तर सुरू झाल्या, मात्र अनेक ठिकाणी एसटी सेवा सुरू झालेल्या नाहीत. दररोज शाळेला जाण्यासाठी एसटी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाताना पायपीट करावी लागत आहे.

एसटी नसल्याने पायपीट करावी लागणाऱ्या अशाच एका त्रस्त विद्यार्थ्यांने परिवहन मंत्री अनिल परब याना उद्देशून एक गाणे गात आपल्या समस्यांना वाचा फोडली आहे. या गाण्यात या विद्यार्थ्याने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना एसटी सुरू करण्याची विनंती केली आहे. तसेच या विद्यार्थ्याने परिवहन मंत्री परब यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली आहे.

या विद्यार्थ्याचे नाव काय आहे, तसेच कोणत्या शाळेत शिकतो, तसेच त्याने हे गाणे स्वत: रचले आहे की इतरांचे गाणे त्याने गायले आहे यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

या विद्यार्थ्याने गायलेल्या गाण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

असे आहे विद्यार्थ्याने गायलेले गाणे-

एसटी चालू करा

शाळेला जायला उशीर झायला
एसटी चालू करा,
परबसाहेब एसटी चालू करा

एसटीचा कारभार तुमच्याच हाती
कामगारांची तुम्ही केलात माती
आत्महत्या इथे झाल्यात किती
तरीपण तुम्हाला वाटेना भिती
जनतेचं हाल तुम्हीच केलं
खुर्ची खाली करा,
परबसाहेब खुर्ची खाली करा

मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे
घरात जाऊन गुपचूप झोपले
जिथं तिथं बंगले बांधून आपले
मेव्हण्याने तुमच्या भललेत टोपले
निवडून यायला, मतं मागायला
येऊ नका आमच्या घरा
परबसाहेब, येऊ नका आमच्या घरा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button