breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास महागणार; १ एप्रिलपासून नवे टोल दर लागू

एक्स्प्रेस वेवरील टोल दरात १८ टक्क्यांनी वाढ

पुणे : महागाई, इंधनदर, गॅसची दरवाढ यामुळे सर्मसामान्यानंचे कंबरडे मोडले आहे. दिवसोंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला खर्चाची कात्री लागताना दिसत आहे. यातच आता मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवासही महागणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील टोल दरांत मोठी वाढ करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास आणखी महागणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून द्रुतगती माग्रावर प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. सन २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांत १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असं एमसआरडीकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई-पुणे एक्स्पेसवेवरील प्रवासासाठी टोलचे नवे दर पुढीलप्रमाणे :

वाहनआत्ताचे टोल१ एप्रिलपासून नवे टोल दर
चारचाकी२७०४९५
टेम्पो४२०४९५
ट्रक५७०९४०
बस७९७९४०
थ्री एक्सेल१३८०१६३०
एम एक्सेल१८३५१८३५
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button