breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे | मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त ३ हजार ५०० क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख गणेश तळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करताना सुरेंद्र नवले यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत माहिती दिली. कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा    –    तळेगावच्या स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात खासदार बारणे यांचा सहभाग

कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक टाळू नये. मतदान प्रक्रिया ही निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे, असे आवाहन सुरेंद्र नवले केले.

विक्रम देशमुख यांनी मतदान यंत्राबाबत माहिती दिली. प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत. प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेंद्र नवले यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button