TOP News । महत्त्वाची बातमी

पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी पुन्हा वाढले : नऊ दिवसात आठव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या 

मुंबई l प्रतिनिधी

सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. नऊ दिवसात आठव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. बुधवारी (दि. 30) पेट्रोल 80 पैसे ते डिझेल 80 पैसे प्रति लिटर प्रमाणे वाढले आहे.

मागील नऊ दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल 5.60 रुपयांनी महागले आहे. मंगळवारी पेट्रोल 80 पैसे तर डिझेल 70 पैसे प्रति लिटर प्रमाणे महागले होते.

पेट्रोल, डिझेलचे काही शहरांमधील आजचे दर

दिल्ली : पेट्रोल – 101.01 रुपये प्रति लीटर, डिझेल – 92.27 रुपये प्रति लीटर

मुंबई : पेट्रोल – 115.88 रुपये प्रति लीटर, डिझेल – 100.10 रुपये प्रति लीटर

कोलकाता : पेट्रोल – 110.52 रुपये प्रति लीटर, डिझेल – 95.42 रुपये प्रति लीटर

चेन्नई : पेट्रोल – 106.69 रुपये प्रति लीटर, डिझेल – 96.76 रुपये प्रति लीटर

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button