breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीव्यापार

Tiktok Entry : मायक्रोसॉफ्ट या चिनी एपचा जागतिक व्यवसाय खरेदी करू शकते

चीनचे लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकची पुन्हा भारतात एंट्री होऊ शकते. कारण अमेरिकेची दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा ग्लोबल बिझनेस खरेदी करण्याचा विचार करत आहे. यात भारत आणि युरोपमधील व्यवसायाचा समावेश असू शकतो. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दावा केला गेला आहे.

टिकटॉकच्या खरेदीबाबत मायक्रोसॉफ्ट याची पॅरेंट कंपनी बाइटडान्ससोबत चर्चा करत आहे. दरम्यान या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने रॉयटर्सने म्हटले की, मायक्रोसॉफ्टने संपूर्ण टिकटॉक खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला नाही. रॉयटर्सनुसार, मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधील व्यवसाय खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहे. अद्याप कराराची किंमत उघडकीस आलेली नाही. बाईटडन्स कार्यकारी तिकिटकॉकचे मूल्य 50 अब्जपेक्षा जास्त सांगत आहेत.

भारतानंतर अमेरिकेने चायनीज अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्सवरील बंदीच्या आदेशावर गुरुवारी स्वाक्षरी केली. यानुसार 45 दिवसांनंतर ही बंदी लागू होईल. टिकटॉकसोबत चायनीज अॅप वीचॅटवर देखील बंदी घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button