breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळ विमान अपघात: मृतामध्ये एक जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इतर जखमींना नातेवाईकांना भेटण्यास बंदी

केरळच्या कोझिकोडमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघातानं संपूर्ण देशालाच हादरा दिला. या अपघातात १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बातमी मिळाल्यानंतर या विमानातील प्रवाशांचे अनेक नातेवाईक लॉकडाऊन काळातही इथं पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, इथं पोहचल्यानंतरही जखमी प्रवाशांची भेट नातेवाईकांना घेता येणार नाहीये. कारण ४५ वर्षीय मृत प्रवासी सुधीर वायर्थ यांचे सॅम्पल्स इतर मृत प्रशांच्या सॅम्पलसोबत करोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला की जखमी प्रवाशांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येणार नाहीये.

दरम्यान, उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसान भरपाई तर गंभीर जखमींना २ लाखांची मदत तसंच किरकोळ जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा उड्डाणमंत्र्यांनी केलीय.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफि इंडियाच्या माहितीनुसाार, एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान कोझिकोड विमानतळाजवळ रनवेपासून १००० मीटर अगोदरच टॅक्सी वेजवळ धडकलं होतं. करीपूर एअरपोर्टच्या पठारावर विमानाचं लँन्डिंग करताना ते घसरलं आणि थेट दरीत कोसळलं. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानातून पायलट आणि क्रू मेम्बरसहीत १९१ प्रवासी प्रवास करत होते. यातील एक मृत प्रवासी करोना पॉझिटिव्ह असल्याचं नुकतंच समोर आलंय. या घटनेतील १४९ जखमी प्रवाशांना मलप्पुरम आणि कोझीकोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील २२ जणांची प्रकृती गंभीर आहे तर २२ जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

४५ वर्षीय मृत प्रवासी सुधीर वायर्थ यांचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह आढळल्यानं आता एअरपोर्टवर रेस्क्यु कार्यात जोडल्या गेलेल्या सर्व लोकांना क्वारंटीन केलं जातंय. त्यांचे सॅम्पल्सही करोना चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये हातभार लावणाऱ्या सर्व लोकांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असं आवाहनी आरोग्य मंत्र्यांनी केलाय. विमान अपघातात आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगरच कोसळलाय. परंतु, करोना धोक्याच्या पार्श्वभूमीवर जखमींच्या नातेवाईकांनाही भेटता येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button