TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांना अनुदानित पास वितरण

पिंपरी चिंचवड | पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अनुदानित पासेसचे वितरण सुरु करण्यात आले आहे. मनपा हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतील इ. 5 वी ते 10 वी तसेच पिंपरी-चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना 2021-22 करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु करण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड मनपा अनुदानित बसपास अर्जाचे वितरण 27 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. अर्जाची स्वीकृती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये करण्यात येईल तसेच महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून सुद्धा फक्त अर्जाचे वाटप करण्यात येईल. महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये शैक्षणिक संस्था व त्यांचे प्रतीनिधी यांनी शालेय विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही. असे महामंडळाने म्हटले आहे.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25 टक्के रक्कम चलनान्वये पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ बडोदाचे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button