breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 : वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांच्या किंमती गगनाला भिडल्या!

भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट तब्बल १९ लाखांत

World Cup 2023 : ५ ऑक्टोंबरपासून भारतात वन डे विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. १४ ऑक्टोंबर रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठीच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री झाली आहे. काही क्षणातच या सामन्यांची सर्व तिकीटी विक्री झाली आहेत. या सामन्याचं एक तिकीट तब्बल १९ लाख ५१ हजार ५८० रूपयांना विकलं गेल्याची माहिती मिळत आहे.

Viagogo या आयसीसीच्या ग्लोबल तिकीट विक्री कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एक तिकीट तब्बल १९ लाख ५१ हजार ५८० रूपयांना विकलं गेलं आहे. या कंपनीकडे अजून १०० तिकीटं आहेत. ५ ऑक्टोंबरला इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याची तिकीटं १०००, १५००, २०००, ३०००, ६००० रूपयांना विकली गेली आहेत. मात्र भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकीटांची किंमत ६६ हजार ते १९ लाखापर्यंत होती.

हेही वाचा – सर्वसामान्यांना मोठा धक्का! सहा वर्षांतून पहिल्यांदाच साखरेचे दर वाढले

Viagogo वर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात लखनौ येथे होणाऱ्या सामन्याचं तिकीट २ लाख ३४ हजार ६३२ रुपयांना विकलं गेलं. भारत वि. अफगाणिस्तान यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर लढत होणार आहे आणि त्यांच्या तिकिटाची किंमत ३८ हजार ८७७ पासून सुरू झाले होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होणाऱ्या सामन्याची तिकिटाची किंमत ३१ हजार ३४० ते ९ लाख ३१ हजार २९५ रुपये इतकी आहे.

भारताचे संपूर्ण वेळापत्रक –

  • ८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया – चेन्नई
  • ११ ऑक्टोबर दिल्ली – अफगाणिस्थान
  • १४ ऑक्टोबर अहमदाबाद – पाकिस्तान
  • १९ ऑक्टोबर – पुणे – बांगलादेश
  • २२ ऑक्टोबर – धर्मशाला – न्यूझीलंड
  • २९ ऑक्टोबर – लखनौ – इंग्लंड
  • २ नोव्हेंबर – मुंबई – श्रीलंका
  • ५ नोव्हेंबर कोलकाता – दक्षिण आफ्रिका
  • १२ नोव्हेंबर बेंगलोर – नेंदरलँड
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button