breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वसामान्यांना मोठा धक्का! सहा वर्षांतून पहिल्यांदाच साखरेचे दर वाढले

Sugar Rate : देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे, यावर सरकार काम करत आहे. महागाई संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. टोमॅटोसह डाळींचे दर वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. गेल्या १५ दिवसांत त्याच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर ३७,७६० रुपये प्रति टन पर्यंत वाढले, जे ऑक्टोबर २०१७ नंतरचे सर्वोच्च आहेत.

१ ऑक्टोबरपासून साखर उत्पादनाचा नवा हंगाम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत कमी पावसामुळे साखरेचे उत्पादन ३.३ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ३१.७ मिलियन मेट्रिक टनांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा – वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना इतर राज्याप्रमाणे वीज कंपन्यामध्ये सामावून घेण्याची मागणी!

अशोक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरेचे दर असेच वाढत राहिले, तर केंद्र सरकार तिच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते. जेणेकरून देशांतर्गत बाजारात त्याच्या किंमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button