breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, ३ पोलीस कर्मचारी निलंबित

दोन बीट मार्शल आणि एका चौकी अमलदाराचं निलंबन

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत भरदिवसा एका तरूणीवर कोयता हल्ला झाला होता. तरूणीवर वार करणाऱ्या शांतनु जाधव याला पुणे पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र पुणे शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तांनी विश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकातील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस हवालदार सुनील ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत जगदाळे आणि सागर राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले..

दरम्यान, पुणे पोलिसांनी युवक अन् युवतींमध्ये जागृकता निर्माण करण्यचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी काही टीप्स जारी केल्या आहेत.

मुलींनो हे कराच..

  • रिक्षाने एकटी जाताना रिक्षाच्या नंबर प्लेटचा फोटो काढा
  • प्रवास सुरू केल्याप्रकरणी घरी फोन करून या रिक्षेने बसली आहे, ती माहिती द्या. म्हणजे रिक्षावाल्यास कळेल की त्याची माहिती पोहचलेली आहे.
  • उशीरा रिक्षा मिळत नसेल तर पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधा.
  • तुम्ही ज्याच्याबरोबर जात आहात ते ठिकाणी सुरक्षित आहे का? याची खात्री करा.
  • ज्याच्याबरोबर जात आहात तो विश्वासाचा आहे का? हेही जाणून घ्या.
  • सहलीला ग्रुपने जाताना सर्व जण परिचित आहेत का? हे समजून घेऊन सहलीस जाण्याचा निर्णय घ्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button