breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले..

अजितदादासोबत शपथ घेण्यापुर्वी पवारांनी भूमिका बदलली

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. हा शपथविधी नेमका कसा झाला? याबाबत अनेक नेत्यांनी वक्तव्य केली आहेत. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी रिपब्लिक भारतच्या मुलाखतीत याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची हिस्टरी समजून घ्यायला हवी. तरच ही मिस्ट्री कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमची फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.

यानंतर आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्ऴ अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – २०२४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

आम्ही पुर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरूवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी जे केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button