breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय’, डोंबिवलीच्या आजारी शिवसैनिकाची एकनाथ शिंदेंकडून विचारपूस

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद आता संपूर्ण राज्यापुढे उघड झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत गुवाहाटीत निघून गेलेल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा हेतू काही साध्य झाला नाही. तर एकनाथ शिंदेही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आता ठाकरे आणि शिंदे हे कायदेशीर लढाईसाठी तयारी करत असल्याची माहिती आहे. या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांशी किती जवळचे आणि आपुलकीचे संबंध आहेत याचं उदाहरण पाहायला मिळालं.

डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ तारखेला अचानक तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या शिवसैनिकाची तब्येत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर २३ तारखेला सायंकाळी साडे ५ वाजता शिंदेंनी थेट एम्सच्या डॉक्टरांना कॉल केला. “आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा, माझा कार्यकर्ता जगला पाहिजे”, अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना केल्या. एकनाथ शिंदे यांच्या या फोननंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख, मंगेश चिवटे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत माहिती दिली. महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या उलाढाली सुरुये. महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतक्या पेचात गुंतलेले असतानाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button