breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारण

खोट्या-नाट्या केसेसविरोधातील ही लढाई, आव्हाडांनी लढावं ः सुप्रिया सुळे

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने विनंती आहे की, त्यांनी लढलं पाहिजे. वाईट वाटून घेता कामा नये, ही लढाई खोट्या नाट्या केसेस विरोधातील आहे. त्यामुळे आपल्याला लढवचं लागणार आहे. आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होत्या.

आव्हाडांनी राजीनामा देऊ नये
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या वतीने आणि माझ्यावतीने सांगेन त्यांनी राजीनामा देऊ नये. असे आवाहन केले आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, मुंब्र्यातील लोकांनी आव्हाडांना विश्वासाच्या नात्याने निवडणून दिले आहे. ते उत्तम आमदार आहे, त्यांचे संसदेतील कामकाज देखील उत्तम राहिले आहे, त्यांच्या मतदार संघात त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. ते मंत्री असू दे किंवा आमदार त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यामुळे लोकांसाठी असा निर्णय घेऊ नये. आणि पक्षाच्या वतीनेही जयंत पाटील त्यांच्यासोबत बोलले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची विनंती आहे की, त्यांनी लढलं पाहिजे. वाईट वाटून घेता कामा नये, ही लढाई खोट्या नाट्या केसेस विरोधातील आहे. त्यामुळे आपल्याला लढवचं लागणार आहे.

सत्यमेव जयते… सकाळी एक केस रात्री एक केस झाली. सकाळी एक व्हिडीओ आला त्यानंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला, त्यात जितेंद्र आव्हाड महिलेला म्हणतायत की, कशाला तू या गर्दीमध्ये आली जा घरी, इथे खूप गर्दी आहे. त्या फ्रेममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. प्रशासनातील अधिकारी पोलीस दिसत आहेत मोठी गर्दी आहे. फ्रेम पाहिली, यावेळी जे आरोप झाले त्यामुळे प्रचंड वेदना झाल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का?
ती एक महिला आहे, एखादी महिला जेव्हा कोणावर आरोप करत तेव्हा तिची बाजू पूर्णपणे ऐकून घेतलीच पाहिजे. त्यामुळे तो व्हिडीओ तीन चार वेळा पाहिला. दुर्दैव या गोष्टीचं आहे की, राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी तिथे आहेत, त्यात मुख्यमंत्री स्वत; तिथे आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आहेत, पोलिसांची यंत्रणा कार्यकर्ते, सहकारी दिसत आहेत. अशावेळी असे आरोप होणे वेदना देणारं आहे. सर्व महिला राजकारणात येतो ते समतेसाठी येतो. आम्ही महिला आहे म्हणून आमच्यासाठी काही वेगळं करा अशी आमची इच्छा नाही. आम्हाला जे मिळावं ते मेरिटवर मिळावं असा आमचा प्रयत्न असतो, अशा भावनाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button