breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पंड्या IPL२०२४ मधून बाहेर?

Hardik Pandya : मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे हार्दिकला अफगाणिस्तानची मालिका तर सोडावी लागणार आहे. यासोबतच, आयपीएल २०२४ मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अद्याप पंड्याच्या प्रकृतीत हवा तसा बदल दिसून आलेला नाही, ज्यामुळे पंड्याला अफगाणिस्तानची मालिका तर सोडावी लागूच शकते पण बहुचर्चित मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावर असूनही खेळण्याची संधी गमवावी लागू शकते. हार्दिकही घोट्याच्या दुखापतीतून बरा होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेलाच मुकणार नाही तर आयपीएल २०२४ च्या सीझनमधूनही बाहेर पडू शकतो.

हेही वाचा  –  अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजप खासदाराचा मोठा दावा 

हार्दिक पंड्याच्या दुखापतीचा सर्वात मोठा परिणाम झाल्यास त्याच्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर होणार आहे.अलीकडेच आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून घोषणा केली. १५ कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पंड्याने संघात वापसी केल्याची सुद्धा चर्चा आहे. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीचा हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button