breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : लांडगे, जगताप अन् बारणेंची ‘महायुती’; महापालिकेत मिळवणार का सत्ता एकहाती?

राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढली

महायुतीची ताकद तुलनात्मकदृष्या सर्वाधिक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय ‘शक्तीस्थळे’ असलेले भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे एकत्र आल्यामुळे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना ‘महायुती’ची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महापालिका आगामी निवडणुकीत ‘महायुती’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात आहे.
२०१७ च्या निवडणुकीत तत्कालीन शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड महापलिकेत बहुमताने सत्ता मिळवली. त्यावेळी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपाच्या विजयात जगताप यांना मोलाची साथ दिली.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात दिलजमाई झाली. ‘महायुती’चे उमेदवार म्हणून बारणे यांनी राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव केला. मावळ मतदार संघातील चिंचवड आणि पिंपरी मतदार संघात लक्ष्मण जगताप यांनी युतीधर्माचे पालन करीत बारणेंना साथ दिली. त्यामुळे मोठ्या फरकाने बारणे विजयी झाले. या दोन्ही नेत्यांचा प्रभाव पिंपरी आणि चिंचवडमध्ये तुल्यबळ आहे. त्याचा फायदा महायुतीला होणार आहे.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आमदार जगताप सक्रीय राजकारणापासून काहीकाळ अलिप् राहीले. मात्र, ‘‘प्रथम राष्ट्र…नंतर पक्ष आणि शेवटी मी..’’ या विचारांचे तंतोतंत पालन करीत जगतापांनी सर्व महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचे उमेदवार विजयीही झाले.
वास्तविक, पूर्वाश्रमीचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेश लांडगे यांनी एकत्रितपणे चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली. शहरातील स्थानिक मुद्यांवर सामोपचाराने आणि समन्वयाने निर्णय घेण्याचा पायंडा घातला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील निर्णय प्रक्रियेत भूमिपुत्र स्थानिकांना समाविष्ट करुन घेण्याचा केलेला निर्धार भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्यांनी खरा करुन दाखवला. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या ‘बॅकफूट’ वर दिसत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
आमदार लांडगे यांनी संभाव्य फूट रोखली…
आमदार जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाने आमदार लांडगे यांच्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपामध्ये मोठी फूट पडणार आणि २५ ते ३० नगरसेवक राष्ट्रवादीत सहभागी होणार, अशी स्थिती होती. या प्रतिकूल परिस्थितीत आमदार लांडगे यांनी पक्षश्रेष्ठींच्या मदतीने शहरातील भाजपा एकसंघ ठेवली. माया बारणे आणि वसंत बोराटे असे दोन अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या गळाला भाजपातील नगरसेवक लागले नाही.
शंकर जगताप यांची मजबूत बांधणी…
आमदार जगताप यांना प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर मुक्तपणे संचार करता येत नाही. त्यामुळे त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी भाजपा निर्णय प्रक्रियेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्याला जगताप समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. शंकर जगताप कमालीचे सक्रिय झाले असून, चिंचवडचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी पायाला अक्षरश: भिंगरी बांधली आहे. व्यावसायिक क्षेत्रात ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अशी ओळख असलेले शंकर जगताप आमदार जगताप आणि भाजपाचा ‘चिंचवड गड’ सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यामुळे भाजपाची ताकद वाढण्यास मदत झाली आहे.
श्रीरंग बारणेंची सक्रियता भाजपाच्या पत्त्यावर…
खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय चुरस आहे. अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष लक्ष आहे. बारणे यांचे ‘होम पिच’ असलेल्या थेरगावमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे बारणेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्थानिक मुद्यांवर काम करायला वेग दिला. व्यापारी, पायाभूत सुविधांसाठी बारणेंनी महापालिका आणि पिंपरीसह चिंचवड मतदार संघामध्ये बारीक लक्ष घातले आहे. बारणे थेटपणे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत आणि जगताप व लांडगे शहरातील कारभार ताकदीने चालवताना दिसत आहेत. त्यामुळे बारणे, जगताप आणि लांडगे ‘महायुती’ भाजपाच्या पत्त्यावर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button