ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

चोरट्यांनी चोरली पीएसआयची सर्व्हिस रिव्हॉल्वर

अकोला| मोठे धाडस करत चोरट्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या घरात डल्ला मारून त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस हेडकॉटरमध्ये घडला आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस सात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in akola thieves stole service revolver of a psi from police headquarters)

अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सरिता कुवारे हे २१ ते २५ एप्रिल या कालावधीत सुट्टीवर गेले होते. मात्र , काल ते घरी परतले, त्यांनी ड्युटीवर जाण्यासाठी तयारी केली. मात्र नेहमी सोबत असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर घरात शोधूनही मिळाली नाही. अखेर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरी झाल्याचे कुवारे यांच्या लक्षात आले. यासंदर्भात लागलीच त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. आणि कोतवाली पोलिसात सर्विस रिव्हॉल्वर चोरी गेल्याची तक्रार दाखल केली. सर्व्हिस रिव्हॉल्वरसह काही जिवंत काडतुसांसह चोरांनी पोबारा केला. मात्र घरात इतर ठिकाणी पाहिले असता चोरट्यांनी घरातील सामानाची चोरी केलेली नाही. पण, चक्क पोलीस हेडकॉर्टर आणि पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी झाल्याने जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेली रिव्हॉल्वर शोधण्यासाठी कसोसीचे प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांच्या घरी चोरी होऊन आता कितीतरी तासांपेक्षा कालावधी उलटला, तरी या चोरी याप्रकरणात अद्यापही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जिथे पोलिसच सुरक्षित नाही, तिथे सर्वसामान्यांची सुरक्षा कोणी करायची? असा प्रश्न पुन्हा या प्रकारानंतर समोर येतोय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button