breaking-newsमहाराष्ट्र

महाराष्ट्रात 5 ते 7 दिवस उशिराने होणार मोसमी पावसाचे आगमन, आयएमडीचा अंदाज

नवी दिल्ली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार, केरळच्या किनाऱ्यावर यंदा मान्सून सर्वसाधारण वेळेच्या ४ दिवस उशिरा ५ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. यात चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मान्सून वेळेवर दाखल होईल असे सांगितले जात होते.भारतीय उपखंडात दक्षिण अंदमान समुद्रात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. मोसमी वारे आता वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकत आहेत.

मान्सूनच्या सुधारित वेळापत्रकानुसार, अंदमान समुद्रात नैऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत धडकू शकते. मागील काही वर्षांच्या निरीक्षणानुसार अंदमान समुद्रावर मान्सून सक्रियतेचा आणि केरळात मान्सून दाखल होण्यात फारसा संंबंध नाही. मागील वर्षी नैऋत्य मोसमी वारे ६ जूनला केरळात दाखल होतील असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ८ जूनला तेथे मान्सूनचे आगमन झाले होते. सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत मान्सून पूर्ण देश व्यापतो. मात्र गतवर्षी १९ जुलैला मान्सून देशभर पोहोचला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button