पिंपरी / चिंचवड

जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

चौघेजण दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्याचा एका महिलेस त्रास होत असल्याने महिलेचा भाचा शिवीगाळ करणा-यांकडे गेला आणि जाब विचारला. यावरून चौघांनी तरुणाला लोखंडी पाईप आणि पंचने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री अकरा वाजता मोरवाडी येथे घडली.

कुंदन उमेश गायकवाड (वय 22, रा. मोरवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा कोत्तेलू, हनुमंत कोत्तेलू, अजय प्रधान, रॉबर्ट डिसोजा (सर्व रा. मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यामुळे फिर्यादी त्यांच्याकडे गेले आणि माझ्या मावशीला दारू पिऊन का त्रास देता अशी विचारणा केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईप आणि लोखंडी पंचने मारून जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारून ‘याचे कामच करू’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button