breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडला 1 मार्चपासून पाणी कपात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उद्यापासून शुक्रवार (दि. 1) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी कपात लागू होणार आहे. विभागनिहाय आठ दिवसातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे नियोजन महापालिकेने केले आहे.

पवना धरणात केवळ 49.85 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजरोजी धरणात 58 टक्के साठा होता. तुलनात्मक दृष्ट्या 9 टक्के पाणीसाठा जास्त होता. यावर्षी केवळ 49.85 टक्के सठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत महापालिका दिवसाला धरणातून 480 लीटर पाणी उपसा करते. परंतु, पाण्याचा जपून वापर करण्याकरिता रावेत बंधा-यातून दैनंदिन 440 दक्षलक्ष लिटर एवढ्याच पाण्याचा उपसा करण्याबाबत जलसंपदा विभागाने कळविले आहे. जलसंपदा विभागाने पाणी कपात तत्काळ करण्याचे कळविले आहे. त्यानुसार शहराच्या पाणी वापरामध्ये कपात करण्यासाठी सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीबंद करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्यापासून विभागनिहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नागरिकांनी फरश्या, वाहने धुण्यासाठी बगीचा इत्यासाठी महापालिका पुरवित असलेल्या पाण्याचा वापर करु नये. घरातील, इमारतींमधील, नळांमधुन, पाईप्समधून होणारी पाणी गळती बंद करावी. टाक्यांमधून पाणी ओव्हर फ्लो होऊ नये देऊ नये. महापालिकेच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती त्वरित पाणीपुरवठा विभागास कळवावी. सारथी हेल्पलाईनवर तक्रार करावी. पावसाची अनिश्चितता, धरणातील वेगाने कमी होत असलेले पाणी याचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button