पिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये 150 रुपयांची खंडणी मागत टपरी चालकाला मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

वाल्हेकरवाडी येथे एका तरुणाने पान टपरी चालकाला 150 रुपयांची खंडणी मागितली. ती न दिल्याने तरुणाने पान टपरी चालकाला बेदम मारहाण केली. तसेच टपरी चालकाचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी घडली.

कुणाल शिवाजी डोईफोडे (वय 21, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामदास विश्वनाथ पाटील (वय 34, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वाल्हेकरवाडी येथे एकविरा वाईन शॉप जवळ पान टपरी आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता आरोपी कुणाल फिर्यादी यांच्या टपरीजवळ आला. त्याने फिर्यादीकडे 150 रुपयांची खंडणी मागितली. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला. त्यावरून आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन दगडाने फिर्यादी यांना मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांच्या टपरीचे नुकसान करून 24 हजारांचा मोबाईल फोन फोडून त्याचेही नुकसान केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button