breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवचरित्रामधून तरुण पिढीने गड-किल्ल्यांचा इतिहास जवळून अभ्यासावा!; गणेश जवळकर यांचे प्रतिपादन

कासारवाडी |

युवा पिढी सशक्त होण्यासाठी छत्रपती चे शिवचरित्र वाचणे व गड किल्ले अभ्यासणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आयोजक गणेश बबन जवळकर यांनी केले. सत्कर्म सोशल फाउंडेशन व कार्याध्यक्ष गणेश बबन जवळकर (जिल्हा सरचिटणीस भाजप युवा मोर्चा) यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ व बालदिना निमित्त बाल गोपाळाना खाऊ वाटप करण्यात आला लहान गटात प्रथम क्रमांक ऋषिकेश मोटे, व्दितीय क्रमांक अजिंक्य रवी जवळकर,तृतीय क्रमांक जय अशोक मोरे तसेच किल्ले स्पर्धा विशेष पारितोषिक शुभम लांडगे दर्शन धावडे, यांना देण्यात आला.

स्पर्धे मध्ये सहभाग घेतला त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले स्पर्धेचे परीक्षण अतुल दौंडकर, जयदीप साने,अनिकेत कडदेकर यांनी केले या प्रसंगी अर्जुन जवळकर, प्रकाश तात्या जवळकर(जिल्हा उपाध्यक्ष भाजप ) बबन जवळकर,बाळासाहेब जवळकर धावडे अप्पा ,देवदत्त लांडे(जिल्हा चिटणीस भाजप) बाजीराव जवळकर, रघुनाथ जवळकर ,संतोष टोणगे योगेश जवळकर , शशिकांत शेडे, ओमकार गोरडे , अभिषेक जवळकर उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button