ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा प्रशासनाला सार्थ अभिमान : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

महापालिकेतील सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण २१ कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होण्याकरीता अधिकारी तसेच कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत असतात. आज सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने, संघटीतपणे कामकाज करून पिंपरी चिंचवड शहर हे आदर्श, स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपले योगदान दिले असून महापालिकेस त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे ऑक्टोबर २०२३ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण २१ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सेवानिवृत्ती कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारूशीला जोशी, नथा मातेरे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे ऑक्टोबर २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उपअभियंता राजेंद्र क्षिरसागर, मुख्याध्यापक माया रणदिवे, कार्यालय अधिक्षक किशोर ढगे, रमेश मलये, आरोग्य निरिक्षक सुरेशचंद्र चन्नाल, भिमराव कांबळे, मुख्य लिपिक मारूती देवकर, कनिष्ठ अभियंता वक्षुभाई मुलाणी, उपशिक्षक कल्पना मेणसे, अश्विनी गीर, ए. एन. एम. पद्मा जगताप, प्रयोगशाळा सहाय्यक मनोज शर्मा, वायरमन प्रमोद बांदल, मीटर निरिक्षक श्रीकांत ताटी, रखवालदार राजेंद्र हुलावळे, मुकादम विरेंद्र एकल, दिलीप खताळ, मजूर अशोक चव्हाण, एकनाथ जाधव, सफाई कामगार विमल कांबळे, कुंदा निकम यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button