breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

बिबटय़ाची तीन बछडी मातेच्या कुशीत विसावली

कराड |

ऊसतोड सुरू असताना सरीमध्ये सापडलेल्या बिबटय़ाच्या तीन पिलांना त्यांच्या मातेशी भेटवण्याचे वनखात्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याने वन्यप्रेमींकडून समाधान व्यक्त केले गेले. तर, ही तीन बछडी आईच्या कुशीत विसावल्याची चर्चा सर्वत्र कुतूहलाने दिसत होती. तारुख (ता. कराड) येथील पांढरीची वाडीतील शंकर तुकाराम ढेरे यांच्या धरे शिवारात बिबटय़ाची तीन पिल्ले काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास मिळून आली होती.

वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही पिल्ले ताब्यात घेतली. या वेळी पिल्लांसाठी व्याकूळ झालेली बिबटय़ाची मादी तेथेच घुटमळत होती. त्या पिल्लांची मादीसोबत भेट घडवून आणण्यासाठी वन विभागाने तीन पिल्लांना जाळीच्या उघडय़ा क्रेडमध्ये ठेवून परिसरात कॅमेरे लावले. दरम्यान, रात्रीच्या आंधाराचा फायदा घेत मादी बिबटय़ाने आपली तिन्ही बछडी घेऊन ती वनक्षेत्रात निघून गेल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली. या तीन पिलापैकी एक नर तर दोन मादी आहेत. त्यांचे वजन सुमारे अडीच किलो असल्याचे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी म्हटले आहे. या कार्यवाहीत मानद वन्यजीव रक्षक हेमंत केंजळे, वनपाल बाबूराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, आदी सहभागी झाले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button