breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Turkey Earthquake : तुर्कस्तान, सीरियात १० भारतीय नागरिकही अडकले, एक भारतीय बेपत्ता

एकापाठोपाठ पाच भूकंपाचे धक्के; भूकंपामुळे 10 फुट सरकला देश

तुर्कस्तान आणि सीरियात एकापाठोपाठ झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रामाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. या घटनेत आत्तापर्यंत १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे. यामध्ये १० भारतीय नागरिकही टर्कीत अडकले असून एक भारतीय बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

तुर्कस्तान आणि सीरियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपातील मृतांचा आकडा१५ हजारांपुढे गेला आहे. मृतांमध्ये एकट्या तुर्कीतील 6957 जणांचा समावेश असून विशेष म्हणजे इथली जमीन 10 फूट म्हणजेच सुमारे 3 मीटरने हलली आहे. इटालियन भूकंपशास्त्रज्ञ डॉ कार्लो डोग्लियानी यांनी हा दावा केला आहे.

यापूर्वी 2011 मध्ये जपान आणि 2022 मध्ये भारताची जमीनही सरकल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. येत्या काही दिवसांत सॅटेलाइट इमेजमधून अचूक माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले.

दरम्यान, भारताने आत्तापर्यंत चार सी-१७ विमाने टर्कीमध्ये पाठवली असून यापैकी दोन विमानात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तर इतर दोन विमानात वैद्यकीय पथकं पाठवण्यात आली आहेत. तसेच एक सी-१३० विमान वैद्यकीय पथकासह सीरियालाही रवाना करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती दलाचे महासंचालक अतुल करवाल यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button