breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ED ची मोठी कारवाई ; अविनाश भोसलेंची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता सील

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत. अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला होता. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आली आहे. 6 वर्षापूर्वीचे परकीय चलन प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना ईडीने चौकशीकरिता ताब्यात घेतलं होतं.

आता ईडीने परकीय चलन नियमन कायदा 1999 अंतर्गत अविनाश भोसले यांची पुणे आणि नागपूरमधील 40.34 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांचे अनेक राजकीय संबंध आहेत, असं मानलं जातं. अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या संपुर्ण कुटूंबाची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली होती. फेमा अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. 80च्या दशकात ते रिक्षा चालवत होते. त्यानंतर रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाली, त्यानंतर ते रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले, त्यानंतर रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा थक्क करणारा प्रवास आहे. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर त्यांच्या शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध आहेत, असंही सांगण्यात येतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button