TOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘नथुरामची भूमिका ही माझी चूकच’, अखेर अमोल कोल्हे यांचा आत्मक्लेश

पुणे | शिरुर मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. गोडसेंची भूमिका साकारल्याने अमोल कोल्हेंवर अनेकांनी टीका केली. तर काहींनी त्यांचे समर्थनही केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांनीही त्यांचे कलाकार म्हणून समर्थन केले. मात्र आता बर्‍याच दिवसांनी अमोल कोल्हे यांनी काल या भूमिकेबाबत इंद्रायणी नदीच्या किनारी आत्मक्लेश केला.

अमोल कोल्हे यांनी काल आळंदीत इंद्रायणी घाटावर आत्मक्लेश केला. यावेळी ते म्हणाले, ‘अनेक युवा कार्यकर्त्यांनी चूक झाल्याचे सांगितले. तुम्हाला आम्ही छत्रपतींच्या भूमिकेत पाहिले आहे. नथुरामच्या या भूमिकेत पाहू शकत नाही, असे त्यांनी सांगितले, म्हणून मी गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आत्मक्लेश करत आहे’, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रपित्याविषयी हा संशय होऊ नये म्हणून आत्मक्लेश करत असल्याचेही यावेळी कोल्हे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button