breaking-newsTOP NewsUncategorizedटेक -तंत्रताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

नोकरीची संधी: स्टेट बँकेत 5008 लिपिक पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदाच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. SBI मध्ये  लिपिक – ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) च्या SBI क्लर्क 2022 ची 5008 पदांच्या भरती होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात 797 पदे आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे. कोणत्याही शाखेत पदवीप्राप्त उमेदवार SBI क्लर्क पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच SBI या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्राथमिक परीक्षा घेण्याची शक्यता आहे, तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 मध्ये घेणे अपेक्षित आहे.

पदाचे नाव – क्लर्क – कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री)

पद संख्या – 5008 जागा (Maharashtra 797 Vacancies – महाराष्ट्रात 797 जागा)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 30.11.2022 किंवा त्यापूर्वीची असल्याची खात्री करावी. जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात/सेमिस्टरमध्ये आहेत त्यांनी तात्पुरती निवड केल्यास, त्यांना ३०.११.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल या अटीच्या अधीन राहून तात्पुरते अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

-भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

-अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकला भेट द्यावे.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-तुमची सर्व सामान्य माहिती आणि क्रेडेन्शियल(लॉगिन ID आणि पासवर्ड) भरा.

-तुमच्या माहितीचे एकदा व्हेरिफिकेशन करा आणि शेवटी सबमिट करा.

-आपण सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला SBI क्लर्क 2022 साठी अर्ज शुल्क भरावे लागेल.

-अर्ज फी भरल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.

-उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरकन्फर्मेशनचा  मेल किंवा SMS प्राप्त होईल.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

-अधिक माहितीसाठी  PDF जाहिरात वाचा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button