breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला!

वाकड येथील १५ एकर जागेला राज्य सरकारी मंजुरी

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वाकड पेठ क्रमांक ३९ मधील १५ एकर जागा देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय, इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने होणार आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण हद्दीतील पाच पोलीस स्टेशन मिळून पिंपरी चिंचवड व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालय कार्यान्वित झाले. आतापर्यंत पोलीस आयुक्तालयासाठी हक्काची जागा नसल्याने पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस मुख्यालय, अधिकारी निवासस्थाने, परेड ग्राउंड, खेळाचे मैदान उपलब्ध होऊ शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button