breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

TCS कंपनीला कोर्टाने ठोठावला 2 हजार 100 कोटींचा दंड

टाटा समूहातील एका आघाडीच्या कंपनीला अमेरिकेतील कोर्टाने २ हजार १०० कोटींचा दंड केला आहे. अमेरिकेतील एका फेडरल अपिलिय कोर्टाने भारतातील सर्वात मोठ्या आणि क्रमांक एकच्या आयटी कंपनीला मोठा दंड केलाय. टाटा ग्रुपमधील टाटा कंसल्टसी सर्व्हिसेस (TCS)ला तब्बल २ हजार १०० कोटी इतका दंड केलाय.

कोर्टाने TCSला ट्रेड सिक्रेट चोरी प्रकरणी हा दंड केला आहे. विशेष म्हणजे कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हा दंड केलाय. याआधी कनिष्ठ न्यायालयान केलेल्या दंडाविरुद्ध TCSने फेडरल कोर्टात याचिका केली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेला दंड अधिक TCSने म्हटले होते. TCSने शुक्रवारी शेअर बाजाराला माहिती देताना सांगितलं.

TCSने दिलेल्या माहितीनुसार ते अन्य पर्याय शोधत आहेत. त्यांच्या मते Epic systems कडे बैद्धिक संपदेच्या दुरुउपयोग केल्याचा कोणताही पुरावा नाही. Epic systems ने TSCवर बैद्धिक संपदेची चोरी करून एक प्रॉडक्ट तयार केल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी कोर्टाने TCSला आधी ९४० मिलियन डॉलर इतका दंड केला होता. २०१६ मध्ये तो ४२० डॉलर इतका केला. या निर्णयाच्या विरुद्ध TCSने अमेरिकेच्या फेडरल कोर्टात याचिका दाखल केली होती. अमेरिकेतील हेल्थकेअर सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या Epic systemsने टीसीएस वर २८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास २ हजार १०० कोटीचा दावा दाखल केला होता. पण TCSने ही फेटाळून लावली आहे. या प्रकरणी सेबीने मे महिन्यातच टीसीएसला सावध केले होते की, या प्रकरणाची माहिती गुंतवणूकदारांना दिली जावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button