breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाने मृत झालेल्या महापालिका कर्मचा-यांच्या नातेवाईकांना 25 लाखांचे अर्थसहाय

  • महापाैर माई ढोरे यांचे हस्ते अधिकारी व कर्मचा-यांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्या कर्मचा-यांच्या कुटूंबियातील वारसाना प्रत्येकी 25 लाख रुपयाचे अर्थसहाय देण्यात आले. महापाैर माई ढोरे यांचे हस्ते वारसाना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले,नगरसेवक अभिषेक बारणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अविनाश ढमाले, कामगार कल्याण विभागाच्या लिपिक माया वाकडे आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत पावलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे, स्टाफनर्स शोभा भुजबळ, एम.पी.डब्लू भालचंद्र राऊत, रखवालदार तायप्पा बहिरवाडे, तानाजी धुमाळ, शिपाई संभाजी पवार, लिफ्टमन मोहंम्मद शेख, क्लिनर अनिल ठाकुर, वार्ड बॉय ज्ञानेश्वर जाधव, मजुर अनंत कळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेंडगे यांच्या वारसांना विमा योजनेनुसार धनादेश प्रदान करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button