breaking-newsताज्या घडामोडी

चिपळूणातील नवा वशिष्ठी पूल वाहतुकीसाठी खुला

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या वशिष्ठी पुलाचे आज सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानंतर येथील जुना पूल वाहतुकीस बंद करुन नवीन वशिष्ठी पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.

वशिष्ठी नदीवरूल हा पूल ब्रिटीशकालीन आहे. त्याला 81 वर्षे झाली असून तो वाहतुकीस धोकादायक बनला होता. हा पूल 247.5 मीटर लांबीचा असून तो कोकणातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा आहे. 2018 मध्ये या पुलाच्या कामास प्रारंभ झाला होता. सुरुवातीला वेगाने सुरु असलेले काम नंतर रखडले होते. ठेकेदार बदलून चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदार कंपनीकडे हा पूल 2019 मध्ये सोपवण्यात आला होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉसकडाऊनमुळे पूल बांधकामात व्यत्यय आला. मुंबई हायकोर्टानेही याची दखल घेत 31 ऑगस्टपर्यंत पूल पुर्ण करण्याची मुदत दिली होती. आता नवीन वशिष्ठी पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. नवा पूल खुला झाल्याने रत्नागिरी-सिंधूदुर्ग व गोव्यापर्यंत जाणार्‍या प्रवाशांना जुन्या पुलावरून जाण्याची गरज भासणार नाही. गणेशोत्सव व लोकांच्या आग्रहाच्या मागणीवरुन हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तर जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button