breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीकडून 48 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी दिली माहिती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४८ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चास आज (मंगळवारी) स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज (मंगळवारी) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. शहरातील विविध विकास कामांची त्यांनी माहिती दिली. यामध्ये ग क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणेकामी येणा-या सुमारे ५६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीय कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकामी आवश्यक असणा-या १३ टाटा सुमो अथवा तत्सम वाहन भाडे तत्वावर घेणेकामी येणा-या सुमारे १ कोटी १२ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.०८ येथील तिरूपती ते स्पाईन रोड ते आर.टी.ओ कॉर्नर पर्यंत रस्ता दुभाजक करणे व स्थापत्यविषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ६८ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

वाकड येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील पूलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रूंदीकरण करणेकामी सुमारे २० कोटी ५५ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.०५ गवळीनगर व सँडवीक परिसरीमध्ये डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ६८ लाख ६० हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.०३ च-होली येथील मुख्यरस्ता ते काळजेवाडी पर्यंतचा १८ मी. डी.पी. रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे १६ कोटी ३४ लाख ५३ हजार रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. ड क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सर्व कचरा कुंड्या, रस्त्यांचे,गटाराच्या कडेचे कच-यांचे ढीग, मोकळ्या जागेतील कच- यांचे ढीग उचलणे व मोशी कचरा डेपो येथे टाकणे या कामासाठी येणा-या सुमारे ६० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ब क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा ACE वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी कामगार पुरविणे कामी करणेकामी येणा-या सुमारे ९९ लाख ३५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा ACE वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी कामगार पुरविणे कामी करणेकामी येणा-या सुमारे ९६ लाख ४३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

अ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा ACE वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी कामगार पुरविणे कामी करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ०७ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ड क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा ACE वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथेवाहून नेणेचे कामासाठी कामगार पुरविणे कामी करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी २७ लाख २२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१६ विकासनगर.मामुर्डी,किवळे भागातील रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-यासुमारे १ कोटी ५६ लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. क क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने व मनुष्यबळाद्वारे साफसफाई, देखभाल व किरकोळ दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी १७ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button