breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडा

पाकविरुद्ध भारतीय संघ एका अटीनुसार निवडणार, रोहित शर्माने स्पष्टच सांगितली ती अट…

नवी दिल्ली । महान्यूज ।

पाकिस्तानविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाची दुबईमध्ये पत्रकार परीषद झाली. या परीषदेत रोहित शर्मा आला होता. त्यावेळी रोहितला भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी देणार, हा प्रश्न विचारला. त्यावेळी सध्याच्या घडीला संघ निवडीसाठी कोणती एकमेव गोष्ट महत्वाची आहे, याबाबत रोहितने आपले मत व्यक्त केले.

रोहित शर्मा यावेळी म्हणाला की, ” भारतीय संघातील १५ खेळाडूही गुणवान आहेत. आतापर्यंत या १५ जणांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळेच त्यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी ११ खेळाडूंची निवड करताना एकच गोष्ट महत्वाची असेल. सध्या आशिया चषकातील सामने दुबईमध्ये आहेत. आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना रंगत आहे. या खेळपट्टीवरच भारताचाही रविवारी सामना होणार आहे. त्यामुळे रविवारी आम्ही खेळपट्टी कशी आहे, हे पहिल्यांदा पाहू आणि खेळपट्टीचा पोत पाहूनच आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोणत्या ११ खेळाडूंना संधी द्यायची, याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे खेळपट्टी पाहिल्यावरच आम्ही संघातील खेळाडूंबाबतचा निर्णय घेणार आहोत.”

रोहित पुढे म्हणाला की, ” आम्ही खेळपट्टी बनवणाऱ्या क्युरेटरशी चर्चा केली. दिवस-रात्र सामन्यांमध्ये दव सर्वात महत्वाचा घटक असतो. पण इथे जास्त दव पडणार नाही, असे क्युरेटर यांना वाटत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील प्रत्येक संघाला समान न्याय कसा मिळेल, यासाठी क्युरेटर प्रयत्न करत आहेत. याबबातची माहितीही त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे या स्पर्धेत टॉस महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे आता सर्वांनाच उद्याच्या सामन्याची उत्सुकता लागलेली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना म्हटलं की नक्कीच दडपण असतं, हा सामना सोपा नसतो. पण संघातील खेळाडू चांगलेच अनुभवी आहेत. आतापर्यंत त्यांनी बऱ्याचदा दडपण उत्तमरीत्या हाताळले आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंची निवड ही महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता उद्या खेळपट्टी पाहिल्यावरच आम्ही संघ निवडीचा निर्णय घेणार आहोत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button