breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नौदलामध्ये महिलांना पर्मनंट कमिशन देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक म्हणजे पर्मनंट कमिशन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. ज्या महिला सध्या नौदलामध्ये अल्पकालीन नेमणूक म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून कार्यरत आहेत. त्या आता कायमस्वरुपी नेमणूक म्हणून कार्यरत राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. केवळ लिंगाच्या आधारावर सरकार महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. येत्या तीन महिन्यांत महिलांना कायमस्वरुपी नेमणूक देण्यात यावी, असे आदेश सरकारला देण्यात आले आहेत.

कायमस्वरुपी नेमणुकीमध्ये महिला निवृत्तीपर्यंत नौदलामध्ये कार्यरत राहू शकते. सध्या अल्पकालीन नेमणुकीमध्ये महिलांना केवळ १० वर्षेच नौदलामध्ये सेवा करता येऊ शकते. त्यामध्ये गरजेप्रमाणे सरकार चार वर्षांची वाढ करू शकते. पण अल्पकालीन नेमणुकीमध्ये १४ वर्षांपुढे कोणत्याही महिलेला नौदलात सेवा बजावता येऊ शकत नाही. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button